मेंढपाळाची पोरगी बनली क्लास वन अधिकारी

Admin

 

मेंढपाळाची पोरगी बनली क्लास वन अधिकारी

आटपाडी : डिजिटल हॅलो प्रभात
झरे (ता.आटपाडी) येथील श्रीरंग टिंगरे या मेंढपाळाची पोरगी क्लास वन अधिकारी बनली ,अन् मेंढपाळाच्या कुटुंबाचं डोळ्याचं पारणं फिटलं. सर्वसामान्य कुटुंबातील उज्वला एकदम हलाकीच्या परिस्थितीमध्ये शाळा शिकून आई-बापाची गरिबी हटवण्याची मनात जिद्द बाळगून, रात्रंदिवस मेहनत करून आज ती क्लासवन अधिकारी म्हणून यशस्वी झाली. तिच्या या यशाने सर्वच थरातून कौतुक होत आहे व अभिनंदनचा वर्षाव होत आहे. पूर्वीपासूनच जिद्द चिकाटी मनामध्ये बाळगली होती त्याचे फळ मिळाले आणि आई बापाच्या डोळ्याचं पारणं फिटले. कु.उज्वला ची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वर्ग 1 पदी निवड झाली आहे.

उज्वलाचे शालेय शिक्षण ४थी पर्यंत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा झरे व त्यानंतर माध्यमिक शिक्षण ज. ने. वी. झरे येथेच झाले आहे.तिच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असून वडील मेंढपाळ व आई मजुरी करते..परंतु अश्या परिस्थिती मध्ये देखील त्यांनी आपल्या ५ मुली व १ मुलगा यांचे शिक्षण थांबवले नाही. परिस्थिती हालाकीची असून कुटुंब मोठे असून सुद्धा उज्वलाच्या शिक्षणाला आई-वडिलांनी काही कमी पडू दिले नाही. स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला परंतु पोरीचे शिक्षण पूर्ण करायचं हा ध्यास आई-वडिलांनी मनात धरला होता.

 

त्याला आज यश मिळाले. उज्वालाच्या यशात तिचे आई वडील, भाऊ बहिणी सोबतच शालेय जीवनापासून लाभलेल्या सर्व शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. या उज्वलाच्या यशाने झरे व परिसरातून उज्वलाचे कौतुक अभिनंदन होत आहे.
To Top