ब्रेकिंग न्यूज : अजित पवारांच्या विमानाचा अपघात ; बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना

Admin
ब्रेकिंग न्यूज : अजित पवारांच्या विमानाचा अपघात
 बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना 

बारामती : हॅलो प्रभात
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला असून बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान घटना घडली आहे. विमानात अजित पवार यांच्या सोबत त्यांचे सुरक्षारक्षक होते, असंही सांगितलं जात आहे. अधिक माहिती अशी, बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही जण गंभीर जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.





बारामतीमध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या सभा होणार होत्या. त्या सभांसाठी पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. 


दरम्यान विमानामधून कोण कोण प्रवास करत होतं, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून प्रशासनाकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
To Top