समोर वाढल्यात चने पण दातच नाहीत, तर खाणार कसे !

Admin
पाणी भरपूर आहे, पण लाईटच नसेल तर पिक जगणार कसे

लोणी काळभोर : डिजिटल हॅलो प्रभात 
समोर वाढल्यात चणे दातच नाहीतर खाणार कसे साहेब पाणी भरपूर आहे पण लाईटच टिकणार नसेल तर पिक जगणार कसे हवेलीतील महावितरणला तालुक्यातील शेतकऱ्यांची भावनिक साद हवेली तालुक्यातील परिसरात उन्हाळ्यात लाईटीच्या लपंडावामुळे पालेभाज्या पिकाला मोठा फटका अनेक शेतकरी मोठ्या संकटात उन्हाने हाती आलेला घासच हिरावून घेतला.
        चूक महावितरणाची फटका शेतकऱ्याला मे महिन्याचा पहिला आठवडा आणि त्यात 40 सेल्स पेक्षा जास्त तापमान त्यात वारंवार जाणारी लाईट त्या मुळे हाती आलेल्या पालेभाज्या उन्हाच्या तीव्रतेने करपून जाऊ लागल्या आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे हाती आलेला घासचं जर लाईटीअभावी करपून गेला तर दुकानदाराचे खते बियाण्यांचे औषधांचे खाते कसे फेडणार अशी चिंता आता शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे खास करून तीव्र उन्हाच्या झळां बसू नये म्हणुन सकाळ सकाळ पाणी पिकाला देणं गरजेचं असत त्या मुळे सकाळीच जर शेती भिजवली तर दिवस भर पडणारे टेंपरीचर हे मेंटेन राहते त्या मुळे पिके जळणायची शक्यता कमी होते जर सकाळीच लाईट गेली तर शेतकरी पिकाला पाणी देणारं कसा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे त्यात वारंवार जाणारी लाईट हि शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असून अनेक पाले भाज्या जळून नष्ट होऊ लागली आहे खास करून मेठी पिकाला मोठा फटका बसला आहे सतत जाणारी लाईट त्या मुळे कुकुत पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पण्याच्या टाक्या भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इतकेच नाहीतर कुकुट पालना मद्ये मोठी हानी होऊ लागली आहे तीव्र उन्हाच्या झळांनी कुक्कुटपालनामध्ये मोटीलिटी मध्ये मोठी वाढ झाली आहे.वारंवार जाणाऱ्या लायटीमुळे शेतकरी पोल्ट्री व्यावसायिक यांच्या पुढे मोठा संघर्ष आहे.
To Top