यशवंत एज्युकेशन सोसायटीचा सभासद यादीत फेरफार
संस्थेच्या संचालक मंडळाचा आरोप : ग्रामस्थांमधुन संतप्त प्रतिक्रिया.
देवराष्ट्रे : संदेश जाधव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुबातील सोय व्हावी या हेतुने देवराष्ट्रे ता. कडेगाव येथे यशवंत एज्युकेशन सोसायटी या नावाने शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची सोय केली हजारो विद्यार्थी शिक्षण होऊन केली. या शिक्षणसंस्थेतून हजारो विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. यशवंत शिक्षणाची वेगवेगळ्या या शिक्का संस्थेसाठी गावातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे योगदान राहिले आहे.
मात्र सध्याचे विदयमान सचिव व सर्वसामान्य कुटुबाचे सहसचिव यांनी संस्थेच्या संचालक मंडलास अंधारात ठेवून योगदान देणाऱ्या जुन्या सभासद यादीतुन वगळून आपले नातलग, सगसोयरे आदींची नावे धुराडली आहेत. असा आरोप संस्थेचे अध्यक्ष मोहन मोरे , उपाध्यक्ष महादेव महिंद ,आनंदराव मोरे आदि संचालकांनी केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, संचालक नूतन कार्यकारणी मंजुरीसाठी धर्मादाय आयुकत सांगली येथे बदल अर्ज दाखल करण्याची जबाबदारी सचिव व सहसचिव यांनी घेतली होती. या बदल अर्जाबरोबर मयत सभांसदाची नावे कमी करून उर्वरित सभासदांची यादी दाखल करण्याचे ठरले होते. परंतु सचिव व सहसचिव यांनी नवीन एकशे दहा सभासदंची यादी दाखल केली. ही बाब संचालक मंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर संचालक मंडळाने धर्मादाय कार्यालय सांगली येथे धाव घेतली आहे.