शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा दुसरा टप्पा 2 जूनपासून

Admin
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा
 दुसरा टप्पा 2 जूनपासून

सांगली : हॅलो प्रभात
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT)-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.


या परीक्षेचे आयोजन दि. 24 मे 2025 ते 5 जून 2025 प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार होणार असून, यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल, असे दि. 25 एप्रिल 2025 च्या अधिसूचनेव्दारे कळविण्यात आले होते. 

Join Our WhatsApp Group 

त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT) -२०२५ परीक्षा घेण्याचे नियोजन दि. 27 ते 30 मे 2025 व 2 ते 5 जून 2025 या कालावधीत करण्यात आले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

To Top