सख्या भावानेच सहा लाखाची सुपारी देवून केला खुन

Admin
सख्या भावानेच सहा लाखाची सुपारी देवून केला खुन
तमदलगे बसवान खिंडीतील खुनाचा उलगडा

जयसिंगपूर : हॅलो प्रभात
तमदलगे बसवान खिंडीतील खुनाचा उलगडा करत पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात सख्या भावानेच सहा लाखाची सुपारी देवून खुन केल्याची धक्कादायक घटना समोर मंगळवार दि. ७ मे २०२५ रोजी सकाळी बसवान खिंडीत असले डोंगरात निमशिरगाव ता. शिरोळ येथील अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्राने खुन केला असले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास कामी जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील दोन व स्थानिक गुन्हे शाखेकडील तीन पथके अशी पाच पथके तयार करून सदर दाखल गुन्ह्याचा तपास करत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील तपास पथकास चौकशी दरम्यान भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याचेवर संशय आलेने त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने सख्या भाऊ अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील हा दररोज दारू पिवून घरी भांडण करून त्यांच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असलेने त्याच्या क्रुत्याला कंटाळून त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खुप त्रास देत असलेने त्याचा काटा काढणेचा आहे. असे सांगितले. 

Join Our WhatsApp Group 

त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील याने ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार धनगर वाडा कुंभोज रोड दानोळी यास बोलावून घेऊन अविनाश उर्फ दिपक पाटील याला ठार मारणेचे आहे असे सांगितले त्यावर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दिपक पाटील यास मारणेसाठी सहा लाख रूपये देण्यास सांगितले. जिनगोंडा पाटील याने भाऊ अविनाश उर्फ दिपक पाटील यास ठार मारायच्या आधी तीन लाख व मारले नंतर तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले.नंतर जिनगोंडा पाटील याने ठरलेल्या प्रमाने राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यास मोहन प्रकाश पाटील यांचे मध्यस्थीने तीन लाख रुपये रोख रक्कम दिली.त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दिपक पाटील यास ठार मारणेकरीता त्याचे सहकारी मित्र किरण आमन्ना थोरात, सागर भीमराव लोहार,अमर रामदास वडर यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दीपक पाटील यांचे वर तो घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोमवार दि. ६ मे २०२५ रोजी संधी पाहून रात्री तमदलगे गावचे हद्दीत बसवान खिंडीत असले निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दिपक पाटील यांचे डोक्यात दगड घालून निर्घृण खुन केले असलेची कबुली दिलीने आरोपी जिनगोंडा ओमगोंडा पाटील व.व. ३७ राहणार सांगली बायपास रोड गौंडप्पा मळा निमशिरगाव तालुका शिरोळ,मोहन प्रकाश पाटील व.व.३३ राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंपाजवळ निमशिरगाव,राकेश उर्फ विनोद वसंत थोरात व.व. २३ राहणार धनगर वाडा कुंभोज रोड दानोळी,किरण आमान्ना थोरात व.व.२७ राहणार नवीन पाणी टाकी धनगर वाडा दानोळी,सागर भिमराव लोहार व.व.३० राहणार दिलदार चौक भादोले (ता.हातकणंगले) अमर रामदास वडर व.व.३३ राहणार दिलदार चौक भादोले (ता.हातकणंगले) यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे.

Tags
To Top