इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला ; 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती

Admin
इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला
20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती

पुणे : हॅलो प्रभात
कुंडमळा (ता.मावळ) येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल रविवारी (15 जून) दुपारी अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुंडमळा या पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होती. 


दुपारी साडेतीनच्या सुमारास पूल अचानक कोसळला. यावेळी अनेक पर्यटक आणि काही लहान मुले पुलावर उपस्थित होती. पूल कोसळताच अनेकजण थेट नदीत पडले आणि जोरदार प्रवाहात वाहून गेले. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळी पिंपरी-चिंचवड पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन दाखल झाले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 32 लोक जखमी झाले असून त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Group 
To Top