युवकांनी श्रमाचे महत्त्व जाणावे : दिग्विजय चव्हाण

Admin

 


जत : डिजिटल हॅलो प्रभात (जॉकेश आदाटे) 

आयुष्यात श्रमाशिवाय पर्याय नाही. श्रम केल्याशिवाय यशाची स्वप्ने पूर्ण होऊन सर्वांगीण प्रगती होत नाही. विद्यार्थ्यांनी श्रमाचे महत्त्व जानावे व आयुष्यात प्रगती करावी, असे उद्गार दिग्विजय चव्हाण यांनी व्यक्त केले. ते मौजे खलाटी, (ता.जत) येथे राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित साप्ताहिक विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत दादा चव्हाण, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, सरपंच सौ. लता देवकते उपस्थित होत्या. 

       स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रप्रेम, देशभक्ती, संघटन व एकता शिकवते. शिबिराच्या सात दिवसात युवकांमध्ये प्रचंड बदल झालेला दिसेल. मला खात्री आहे की, स्वयंसेवक मनापासून व प्रामाणिकपणे सेवेचे काम करतील व महाविद्यालयाबरोबर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नाव मोठे करतील. अभिजीत चव्हाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.लता देवकते यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या साप्ताहिक श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले. 

      उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, सूत्रसंचालन प्रा. तुकाराम सन्नके यांनी तर आभार प्रा. पुंडलिक चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य प्राध्यापक, माजी उपसरपंच शहाजी जाधव, मेजर बंडू शेजुळ, गणेश शेजुळ, अंकुश शेजुळ, ॲड. संदीप कोळी, प्रदीप कोळी, महेश कोळी, सागर बनकर, सुरज कोळी, ज्ञानेश्वर देवकते, सदाशिव बनसोडे, शशिकांत कोळी, पोपट कोळी‌, विठ्ठल कोळी, बाळासो पुजारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटी येथील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ADVTTo Top