संतोष राऊत यांचा आ.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
    शिराळा येथील पंचायत समितीला आय.एस.ओ. 9001-2015 हे दर्जेदार व्यवस्थानाचे मानंकन मिळाले आहे. त्यामध्ये आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, सांडपाणी, घन कचरा, व्यवस्थापन, जल जीवन मिशन, रोजगार हमी योजना व सर्व विभागांच्या योजनांमध्ये उत्कृष्ठ काम केले आहे. एकूण कामकाज पहाता हे मानांकन मिळाले आहे. त्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी गट विकास अधिकारी संतोष राऊत यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.To Top