लाच घेताना तहसील कार्यालयातील सहाय्यक लाच लुचपतच्या जाळ्यात

Admin

 

आटपाडी ( जि.सांगली ) डिजिटल हॅलो प्रभात 

फसवणूकीचा गुन्ह्यातून मुक्तता करून गुन्हा निकाली काढण्याकरिता मदतीसाठी तीन हजारांची घेताना आटपाडी तहसील कार्यालयातील महसूल सहायकास रंगेहात पकडण्यात आले. महेबुब नबिलाल बागवान (वय ४२, रा. दत्तनगर, आटपाडी, मूळ रा. लोहारा बुद्रुक, उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. लाचलुपत प्रतिबिंधक विभागाने ही कारवाई केली. 

    तक्रारदार यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याची सुनावणी आटपाडीचे निवासी नायब तहसीलदार यांच्यासमोर सुरू आहे. वरिष्ठांना सांगून गुन्ह्यातून मुक्तता आणि गुन्हा निकाली काढण्याची मदतीसाठी महेबुब बागवान याने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार  सोमवारी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागास देण्यात आली. त्यानुसार तातडीने याची पडताळणी करण्यात आली. संशयित बागवान याने  पाच हजाराची मागणी करून तडजोडीनंतर तीन हजारांची लाच घेण्याची तयारी दाखवल्याची पडताळणीत स्पष्ट झाले.
दरम्यान, मंगळवारी दुपारी आटपाडी तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी बागवान याने तीन हजारांची लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले.  त्याच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, सलीम मकानदरा, राधिका माने, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चालक अनिस वंटमुरे यांचा कारवाईत सहभाग होता.


To Top