ओबीसी संघटना जि.प. निवडणूक स्वबळावर लढणार

Admin

 

साताऱ्यातील चिंतनशिबात ठराव मंजूर

पाटण : डिजिटल हॅलो प्रभात (चंद्रकांत सुतार) 
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष ओबीसी समाजाचे कल्याण करत नाहीत त्यांच्या जनगणनेवर बोलत नाहीत राजकीय आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात देत नाहीत ओबीसी समाजाची मते घेऊन विरोधात काम करीत असल्याचे निर्दक शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढणार असा ठराव ओबीसी संघटनेच्या चिंतन शिबिरात करण्यात आला. येथील कामाठीपुरातील संत गाडगेबाबा महाराज मंदिरात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे चिंतन शिबिर झाले. यामध्ये हा ठराव करण्यात आला यावेळी भरत लोकरे, हरिदास जाधव, भाऊ दळवी, जनार्दन पवार, सुनील पवार, अनिल लोहार, राजेंद्र पिसाळ, भानुदास वास्के, श्रीकांत आंबेकर, राजेंद्र कुंभार, हनुमंत धुमाळ, आदी उपस्थित होते या चिंतन शिबिरात विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. तर अध्यक्ष भाषण भाषणात भरत लोकरे यांनी गट प्रमुखांच्या भाषणाचा आधार घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव मांडला या ठरावाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे चे प्रसिद्धीप्रमुख संजय परदेशी, यांनी प्रास्ताविक केले महासचिव प्रमोद श्री सागर, यांनी सूत्रसंचाल केले तर सुभाष कुंभार यांनी आभार मानले यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.


To Top