स्मशानभूमी शेड कंपाऊंडच्या बांधकामाचा शुभारंभ

Admin

घाटनांद्रे : डिजिटल हॅलो प्रभात

    कवठेमहांकाळ  तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व माजी सरपंच यांनी केलेल्या पाठपुरव्यातून आ.श्रीमती सुमनताई आर आर (आबा) पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सात लाख रुपये निर्धारित खर्चाच्या स्मशानभूमी शेड  कंपाऊंड बांधकामचा शुभारंभ माजी सरपंच व खरेदी विक्री संघाचे संचालक श्री प्रल्हाद बापू हाक्के,कुंडलापुर - गर्जेवाडी विकास सोसायटीचे व्हा.चेअरमन वसंत सरवदे,सरपंच मालन हाक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
            यावेळी उपसरपंच शंकर शिंगाडे,ग्रामपंचायत सदस्य सावंत हाक्के,गोकुळा सरवदे,वंदना सुतार,संगीता सरवदे,पुष्पाताई हाक्के सोसायटीचे संचालक आनंदा हंकारे,विजय हाके,सोसायटीचे माजी व्हा चेअरमन विजय हाक्के,धोंडीराम सुतारसह ग्रामस्थ उपस्थित होते.


To Top