तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या 650 लोकांवर कारवाई

Admin

भंडारा : डिजिटल हॅलो प्रभात ( साहिल रामटेके) 
 तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 652 लोकांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, एकूण एक लाख वीस हजार पस्तीस रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
येणाऱ्या पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहावी यासाठी शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलीस विभाग,शिक्षण विभाग,आरोग्य प्रबोधिनी संसदेद्वारे जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतो.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर  हे प्रामुख्याने उपस्थित होते.
    जिल्ह्यात एकूण१३२९ शाळांमध्ये नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. १९३शाळा तंबाखू मुक्त झाले असून, कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी व्यसनापासून दूर राहत आहेत. जिल्ह्यातील अन्य शाळा महाविद्यालयांमध्ये पोलीस व शिक्षण विभागांनी अचानक भेटी देऊन या अभियानाच्या यशस्वीता तपासण्यात यावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.


To Top