जरंडी पत्रा येथे 'हाॅटेल शिवारचे' उदघाटन

Admin

 

घाटनांद्रे : डिजिटल हॅलो प्रभात 
जरंडी पत्रा (ता.तासगांव) येथील विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर शिंदे बंधू जरंडी यांच्या  'हाॅटेल शिवार' चे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील यांच्या हास्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून विधीवत 'हाॅटेल शिवार 'चे उदघाटन करण्यात आले.यावेळी बोलताना सुरेश (भाऊ) पाटील म्हणाले की तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय करुन स्वता नोकरी देणारे बनावे.आज मराठी तरूण हाॅटेल व्यवसायात उतरतोय ही चांगली जमेची बाजू आसल्याचेही ते यावेळी म्हणाले. 
        यावेळी सरपंच पितांबर शिंदे,मच्छिंद्र पाटील,अभय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील,सरपंच पितांबर शिंदे,मच्छिंद्र पाटील,अभय पाटीलसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत प्रविण शिंदे यांनी तर आभार भास्कर शिंदे यांनी मानले. To Top