पाल्याचा जि प शाळेतच प्रवेश घ्या : संदीप सावंत

Admin


ढगेवाडी गावातील सर्व चिमुकल्यानी घेतला जि.प.शाळेतच प्रवेश
इस्लामपुर :  डिजिटल हॅलो प्रभात वाळवा तालुक्यातील ढगेवाडी गावात असणाऱ्या जि.प.शाळेत गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या नवीन वर्षातअंगणवाडीतील सर्वच चिमुकल्यानी घेतला इयत्ता पहिलीत प्रवेश..गुढीपाडव्या दिवशी शुभ मुहूर्तावर ढगेवाडी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे वाजत गाजत जल्लोषी स्वागत करण्यात आले..जिल्हा परिषद शाळेच्या गेटवर जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक बाजीराव जाधव,उपशिक्षिका नलिनी पाटील,लोकनियुक्त सरपंच संदीप सावंत यांनी अंगणवाडीतून येणाऱ्या मुलांना पुष्पगुच्छ देऊन तसेच वाजत गाजत प्रवेश करून दाखल करून घेण्यात आले.त्यानंतर वर्गात मिठाई देऊन चिमुकल्यांचे स्वागत केले.अलीकडे महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा मॉडेल्स स्कूल करण्याच्या व जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असून प्रत्येक गावातील स्थानिक स्कूल कमिटी व ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे.यातूनच माझी शाळा आदर्श शाळा संकल्पनेतून शाळांचे वर्ग सुसज्ज करण्याचे प्रयत्न सूर असून प्रत्येक शाळेत शुद्ध पाणी, मोफत आहार ,मोफत गणवेश अशा सर्व सेवा पुरवल्या जात आहेत .तसेच शासन धोरणानुसार पूर्वीपेक्षा वर्षातून पंधरा-सोळा चाचण्या ,परीक्षा घेण्यात येत आहेत.त्यामुळे ढगेवाडी सह ग्रामीण भागातील सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा इयत्ता पहिली पासूनच जिल्हा परिषद शाळेत प्रवेश निश्चित करावा असे ढगेवाडी  लोकनियुक्त सरपंच संदीप सावंत यांनी आव्हान केले आहे.महाराष्ट्र शासनाचे जिल्हा परिषद शाळा ही गोरगरिबांची रक्तवाहिनी असून सर्वसामान्यांना शिक्षण देणारे ज्ञानमंदिर आहे.प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत.तरच गोरगरिबांना शिक्षण मिळू शकेल,आजकालच्या महागाईच्या युगामध्य सर्व सामान्य कुटुंबाला जगणे मुश्किल झाले आहे.आणि स्वतःच्या मुलाला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी शिक्षण ही काळाची गरज असून जिल्हा परिषद शाळेत मिळणारे सर्वच मोफतंचा लाभ घ्यावा असे सावंत यांनी सांगितले.गुढीपाडव्या दिवशी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्याकरिता ढगेवाडीतील सर्व पालकांनी निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक बाजीराव जाधव,उपशिक्षिका नलिनी पवारपाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच संदीप सावंत,सुनील पाटील,प्रकाश खोतयांचे सह पालक उपस्थित होते.


To Top