धनलक्ष्मी पतसंस्थेचा २१ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : सुनील गाढवे

Admin

 

  कडेगाव : डिजिटल हॅलो प्रभात

सोमवार दि.१३ मार्च रोजी कडेगाव येथील श्री धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा २१ वा वर्धापन  साजरा होत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील गाढवे यांनी दिली.ते म्हणाले, समाजातील गरजू युवकांना, उद्योजकांना एकत्र करून सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या हातांना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करता यावी. अशा उदात्त हेतूने पतसंस्थेची स्थापन करण्यात केली.

कोणताही गाजावाजा व डामडौल न करता अतिशय काटकसरीने संस्था सुरू केली. संस्थेचा सुरूवातीचा काळ अतिशय कसोटीचा होता. पतसंस्थांना अतिशय अडचणीच्या प्रसंगातून जावे लागत होते. तालुक्यातील अनेक पतसंस्था डबघाईस आल्याने लोकांचा पतसंस्थावर विश्वास राहिला नव्हता. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही धनलक्ष्मी पतसंस्था ही अपवाद ठरली. कुशल नेतृत्व, सर्वांना विश्वासात घेऊन सल्लामसलत करून संस्थेचे कामकाज चांगले चालण्यासाठी संचालक मंडळ अगदी तळमळीने धडपड करीत आहे. त्यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संस्थेचे कामकाज अगदी सुलभ व पारदर्शी असल्यामुळे सर्व संचालक मंडळ संस्थेच्या वाढीसाठी सतत प्रयत्नशील आहे. संस्था संपूर्ण संगणिकृत असून तीन कर्मचारी व तीन पिग्मी एजंट कार्यरत आहेत. संस्थेने दोन कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेने गरजू उद्योजकांना व्यापार वाढीसाठी, मशनरी खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी तसेच व्यापारात भाग भांडवलासाठी अर्थसहाय्य केले आहे. 
सध्याच्या बँकिंग व्यवसायाचा कल पाहता सर्व बँकांनी सोनेतारण कर्ज वाटण्यावर भर दिला आहे. धनलक्ष्मी पतसंस्थाही सोने तारण कर्ज वाटपात अग्रेसर असून कोणतेही छुपे खर्च न लावता सोने तरणावर कर्ज ताबडतोब वाटप करत आहे. दि.१ मार्च रोजी संस्थेने एक कोटी रुपये सोने तारण कर्जा वाटपाचा टप्पा पूर्ण केला आहे. आज सोमवार दि.१३ मार्च रोजी संस्थेचा २१ वर्धापन दिन साजरा होत आहे. कडेगाव येथील स्थानिक असलेली ही पतसंस्था उत्तरोत्तर प्रगतीपथावर असून समाजाची सेवा करत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील गाढवे यांनी दिली. वर्धापनदिनाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गाढवे यांनी केले आहे.

To Top