गवारेड्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शेतकरी ठार

Admin


पन्हाळा : डिजिटल हॅलो प्रभात (किरण मस्कर) 
पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे या ठिकाणी गवारेड्याने केलेल्या हल्ल्यामध्ये माणिक बळवंत पाटील (वय ५०) यांचा मृत्यू झाला आहे. माणिक पाटील हे दुपारी वैरण आणण्यासाठी महारकी नावाच्या रानात जात होते, याच वेळी रानात आलेल्या गवारेड्यांना काही तरुण हुसकावून लावत होते. दरम्यान बिथरलेल्या गवारेड्याने माणिक पाटील यांच्या छातीत शिंग घुसवले यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना त्वरित उपचारासाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. जंगली प्राणी रानात येऊन पिकाचे नुकसान करतात त्यांना हुस्कवताना वन्य प्राण्यांना इजा झाली तर शेतकऱ्यांवरती कारवाई होते, मात्र वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांचा बळी गेल्यास तुटपुंजी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते जीव गमावल्यानंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाई चा काय उपयोग? अशा प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. याचबरोबर वन विभागाने गवारेड्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.


To Top