शिवगर्जना रॅलीने वंदे मातरम शिवोत्सवाची सांगता

Admin

 

                                             सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 
    वंदे मातरम शिवोत्सवचा समारोप गुरुवारी सायंकाळी भव्य शिवगर्जना मोटर सायकल रॅलीने झाला. भगवे झेंडे भगवे फेटे तसेच जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी रॅली मार्ग शिवमय झाला होता. हजारोहून अधिक शिवप्रेमी या रॅलीत सहभागी झाले होते . भगवे फेटे व भगव्या साड्या अशा पारंपारिक वेषामध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या.तसेच  हलगीच्या तालावर झेंडा फडकवीत  शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त माजी आमदार नितीन शिंदे भाजपा महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्षा अँड स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वंदेमातरम मंडळाने राजवाडा चौकात शिवोत्सव  आयोजित केला.  गुरुवारी सायंकाळी शिवोत्सवचा समारोप शिवगर्जना मोटरसायकल रॅलीने झाला.या रॅलीचा प्रारंभ आमदार सुधीर दादा गाडगीळ भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार राष्ट्रीय स्वयं संघाचे विलास चौधाई अविनाश मोहिते श्रीकांत शिंदे केदार खाडिलकर सुजित राऊत प्रसाद रिसवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. राजवाडा चौकातून रॅलीचा प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या मार्गावर फटाक्यांची आतिष बाजी करण्यात आली होती. राजवाडा चौकात या रॅलीचा समारोप झाला. माजी आमदार नितीन शिंदे अँड  स्वाती शिंदे महापालिकेच्या माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका सुनंदा राऊत, उर्मिला बेलवलकर, लक्ष्मी सरगर, शिवराज बोळाज, अविनाश मोहिते, चेतन भोसले, गजानन मोरे तसेच महिला मोर्चा च्या पदाधिकारी व कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.


To Top