आ.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन

Admin
 शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
    कांदे (ता.शिराळा) येथे जिल्हा वार्षिक योजनेतून ११  लाख २५  हजार रुपये खर्च करुन बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचे श्रीफळ फोडून व फीत कापून उद्घाटन तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता व गटर करणे या २० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष आ.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. या समारंभासाठी यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थितीत होते. विश्वासचे संचालक सुरेश चव्हाण, सरपंच रोहित शिवजातक, उपसरपंच संपत उर्फ छन्नू पाटील, उदगिरी शुगर कार्यकारी संचालक उत्तम पाटील, सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील,उपाध्यक्ष अनिल पवार ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, अमोल पाटील धनाजी पाटील, सुभाष पाटील, माधव मोहरेकर, आनंदा सपाटे, दिलीप शिवजातक, माजी सरपंच मनिषा कुंभार, दत्तात्रय पाटील, काका सावकार, निवास पाटील, नवनाथ कुंभार, बबन पाटील, नानासो भडकीमकर यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतीचे व सोसायटीचे सर्व सदस्य यांच्यासह व ग्रामस्थ उपस्थित होते.To Top