आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे जिवनमान उंचावण्याकरिता व गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर सांगली जिल्हयातील ७९ नागरिकांना अनुदान मंजुर झाले असुन त्याचा धनादेश वाटप आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव जि. पुणे) या कार्यालया मार्फत पारधी विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील पारधी समाजातील ७९ लोकांसाठी कर्ज पुरवठा करण्यात आला. समाजातील नागरिकांना व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार अनुदान देण्यात येणार आहे. त्यांपैकी प्रथम हप्ता ३० हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथील पारधी समाजातील लोकांचा प्रस्ताव अधिक असल्याने त्या धनादेशाचे वाटप आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.