आईचे कष्ट अन्ं जिद्दीच्या जोरावर दहावीत उच्चांकी गुण

Admin


राधानगरी : डिजिटल हॅलो प्रभात
घरची परिस्थिती गरीबीची.... ना स्वतः चे घर ,ना शेती.... आईची मोलमजुरी अन्ं लाकडे विकून मोडकातोडका  संसार.... पण शिकण्याची महत्वकांक्षा आणि शिकून सरकारी नोकरीने आईचे स्वप्न साकार करण्याची धडपड..... त्यामुळे आईचे कष्ट अन्ं जिद्दीच्या जोरावर एका दुर्गम वाडीवस्तीतील मुलीने १२ किमीची पायपीट करत दहावीत मिळविले८६ टक्क्याहून अधिक गुण.या तिच्या यशोगाथेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
 पाच पंचवीस उंबरठे असणारे अवचितवाडी गाव.गावात जेमतेम चौथीपर्यंत शिक्षणाची सोय. पुढच्या शिक्षणासाठी  १०-१२ किमीची पायपीट करावी लागते. त्यात मग मुलगी असेल तर पालकांची चौथीपर्यंतच शिक्षण बस्स.याच गावातील कु.संजीवनी संजय सुर्यवंशी हीने याला बाजू देत शिक्षणासाठी काय पण असे ठरविले. त्यासाठी दररोज ती १२ किमीची पायपीट करत  मौजे कासारवाडा येथे शिक्षणास सुरुवात केली. परंतु घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. आई सुवर्णा सुर्यवंशी मोलमजुरी बरोबरच लाकडाच्या मोळ्या विकून कसाबसा संसाराचा गाडा चालवत होती. त्यात दोन मुलांचे शिक्षण, घरात खाण्याचे वांदे असूनही मुलांना जास्त शिकवण्यासाठी धडपड होती. 
मुलीनेही  टेलरिंग, आईला घरकाम व शेतात काम करत शिक्षण सुरू ठेवले. आईच्या रोजच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव ठेवत तिने स्काँलरशिप, एनएमएमएस सारख्या परिक्षेत यश मिळवून शिष्यवृत्ती मिळवली.
आजीआजोबा, मामामामी व मोठ्या भावाची प्रेरणा व मार्गदर्शन मिळवत रात्रंदिवस अभ्यासावर जोर देत यंदाच्या दहावीच्या परिक्षेत  ८६ टक्क्याहून अधिक मार्क्स मिळवून आईच्या कष्टाचे आणि स्वतः च्या जिद्दीच्या जोरावर उज्वल यश मिळविले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन परिस्थितीची जाणीव ठेवून सरकारी नोकरी मिळवायची व आईने रक्ताचे पाणी करत बघितलेले स्वप्न साकार करायचे आणि कुटुंबाला सुखी करण्याचे तिचे ध्येय आहे. तिच्या या उत्तुंग यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



To Top