सामाजिक कार्य केलेल्यांचा गौरव संपन्न

Admin

 

इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात
वाटेगाव (ता.वाळवा )येथील कै प्रभाकर काळे गुरुजी प्रतिष्ठान,वंदेमातरम संघटनेच्या वतीने काळे गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या लोकांचा व नुतन पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन  गौरव करण्यात आला. 
 स्व.काळे गुरुजी यांच्या घरी जि प चे माझी बांधकाम आरोग्य सभापती रवींद्र बर्डे यांच्या हस्ते काळे गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पा घालून अभिवादन करण्यात आले. कोरोना काळात कोणताही मागचा पुढचा विचार न करता काम केलेल्या, गावामध्ये रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक कार्यात सहभाग घेतलेल्या, कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या व विविध संस्था वरती निवड झालेल्या पदाधिकारी व नूतन सरपंच नंदा चौगुले उपसरपंच सौ सोनाली पाटील यांच्यासह नूतन निवड झालेल्या ३० पदाधिकाऱ्यांचा सत्कार  माधुरी काळे- घोरपडे, गौरी काळे- जामदार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील राहुल पाटील, काळे गुरुजी प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड मोहन काळे, सुधाकर यादव, वसंत काळे, गिरीश घोरपडे ,डॉ भुषण चौगुले, सुनील काळे नाना काळे प्रदीप चव्हाण, शिवाजी गावडे, उदय शेटे, नेमिनाथ खोत, कृष्णा नलवडे, किरण नांगरे,अनंत काळे उपस्थित होते. To Top