महाजन कन्सर्न्स व विवेकानंद मंडळाचे कार्य स्तुत्य : तहसिलदार शामल खोत-पाटील

Admin

 

विवेकानंद वृक्ष संगोपन स्पर्धेचा शुभारंभ 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात

शिराळा येथील हिन्दूस्थान पेट्रोलियम कार्पोशन लि चे गॅस वितरक महाजन कन्सर्न्स  व विवेकानंद सांस्कृतिक, क्रीडा व सेवा मंडळाचे पर्यावरण क्षेत्रातील कार्य स्तुत्य आहे असे गौरवोद्गार शिराळ्याच्या तहसिलदार सौ. शामल खोत- पाटील यांनी काढले. विवेकानंदन वृक्ष संगोपन स्पर्धा-२०२३ च्या शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
      येथील हाय्यर एज्युकेशन सोसायटी च्या कन्या शाळेत हा कार्यक्रम झाला.यावेळी तहसिलदार सौ. खोत व अन्य मान्यवरांच्या हस्ते विवेकानंद प्रतिमा पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. ज्योती हसबनीस- जोशी यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उद्योजिका सौ. सुखदा महाजन यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेचे स्वरूप सांगितले. त्या म्हणाल्या की सन २००६ पासुन आम्ही या स्पर्धा घेत आहोत.फक्त झाडे लावण्या पेक्षा लावलेली झाडे जगवणेही महत्वाचे आहे म्हणुन हा उपक्रम राबवत आहे. यावेळी सौ. महाजन यांनी तहसिलदार सौ. खोत यांचा यथोचित सत्कार केला.सौ. ज्योती जोशी यांना बढती मिळून त्या मुख्याध्यापिका झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कन्या शाळे मार्फत तहसिलदारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तहसिलदार आणि मान्यवरांच्या हस्ते मुलींना सिताफळ, जांभुळ व कवठाची झाडे देण्यात आली. यावेळी बोलताना तहसिलदार सौ. खोत- पाटील म्हणाल्या की महाजन कन्सर्न्स आणि विवेकानंद मंडळ समाजासाठी विविध उपक्रम राबवत असतात. पर्यावरणासाठी हे महत्वाचे आहे. यासाठी कन्या शाळेने सहयोग दिला हे सुद्धा महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे मुलींना संदेश देताना त्या म्हणाल्या की दिलेले झाड जोपासावे कारण एक झाड १० लोकांसाठी काम करत असते.यावेळी जंगलाचा आत्मा हि स्वतः केलेली कवीता सादर करून पर्यावरणा बाबतची वस्तुस्थिती व भावना व्यक्त केल्या.यावेळी कन्या शाळेच्या आवारात तहसिलदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गायत्री जोशी, सुप्रिया सरदेसाई, सौ. अनुजा महाजन, सौ. माधुरी साळुंखे, सौ. प्रतिभा पाटील, सौ. संगिता नलवडे ,  सौ.स्मिता बाडकर,  सौ.शुभांगी खोपडे, भक्ती जोशी, सौ. जयश्री पाटील उपस्थित होत्या. नियोजन जोतीबा जोशी यांनी केले. आभार पर्यवेक्षक विजय काळे यांनी मानले तर सुत्रसंचलन श्रेयस महाजन यांनी केले.To Top