![]() |
सांगली महापालिकेचे उप-आयुक्त वैभव साबळे लाचलुचपतच्या जाळ्यात ; 7 लाखांची लाच घेताना अटक |
सांगली : हॅलो प्रभात
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उप-आयुक्त वैभव साबळे यांना 7 लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी यांना अटक करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजुर करण्याकरीता आरोपी वैभव साबळे यांनी तक्रारदार यांचेकडे १०,००,०००/- रूपये लाचेची मागणी केले बाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.१७.०२.२०२५ रोजी इकडील पथकास दिला होता.तक्रारदार यांनी दिले लाच मागणी तक्रारी अर्जाचे अनुषंगाने दि.२५.०२.२०२५ रोजी आरोपी साबळे यांचेकडे पडताळणी केली असता, आरोपी वैभव साबळे यांनी तक्रारदार यांचे कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजुर करण्याकरीता स्वतः करीता तक्रारदार यांचेकडे १०,००,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ७,००,०००/-रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या अनुषंगाने आरोपी साबळे, वर्ग-१ यांचेविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने आरोपी साबळे, वर्ग-१ यांचेविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]() |
Join Our WhatsApp Group |
दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप व मोबाईल नंबर ९८७०२२९३७९ वर संपर्क साधावा.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल कटके, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या पथकाने केली.