पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी वाचवले व्यक्तीचे प्राण

Admin

 

जत : डिजिटल हॅलो प्रभात
                    विजयपूर-गुहागर राज्य मार्गावर असलेल्या श्री बसवेश्वर चौक येथील अमूल आईसक्रीम पार्लर समोर गुरुवारी रात्री १०.३० वाजता एका व्यक्तीस एका चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. ही व्यक्ती झेब्राक्रॉस वरून रस्ता क्रॉस करत होती. धडक जोरदार बसल्याने ती व्यक्ती जागेवर कोसळली. यावेळी येथे उभे असलेले पोलीस निरीक्षक राजेश रामघरे व पोलीस कर्मचारी सुनील व्हनखंडे व विजय अकुल यांनी लगेच अपघातस्थळी धाव घेत त्या तरुणाचे प्राण वाचवले. त्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 
                    यावेळी श्री. रामघरे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेस संपर्क करून त्या व्यक्तीस शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
To Top