भारती विद्यापीठ धनश्री करडे ला दत्तक घेणार : विश्वजीत कदम यांची घोषणा

Admin

वांगी : डिजिटल हॅलो प्रभात
            कडेगांव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु धनश्री तानाजी करडे हीने इयत्ता 12 वी च्या परीक्षेमध्ये कला शाखे मधून 94.17 टक्के मार्क्स मिळवून कडेगांव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे हे तिचे यश दैदिप्यमान असून तिला पुढील शिक्षणासाठी लागेल ती मदत भारती विद्यापीठाच्या माध्यमातून करणार असून तिला भारती विद्यापीठाच्या माध्यमातून दत्तक घेणार असल्याची घोषणा भारती विद्यापीठाचे कार्यवाह माजी मंत्री आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केली.
कडेगांव येथील कू. धनश्री तानाजी करडे हीच्या घरी जावून आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी तिचा सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते.
            धनश्री करडे अतिशय गरीब कुटुंबातील असून तीचे वडील हमाली व आई मोलमजुरी करतात.
आमदार डॉ विश्वजीत कदम पुढे बोलताना म्हणाले की,अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा धनश्री ने कोणताही क्लास न लावता मोठे यश संपादन केले आहे.तिची पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून जिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे यासाठी आम्ही सर्व ती मदत करणार आहोत.धनश्री चा आदर्श इतर विद्यार्थिनींनी घेवुन मार्गक्रमण करावे.

            यावेळी सागरेश्वर सहकारी सूत गिरणीचे चेअरमन श्री शांताराम बापू कदम, कडेगांव चे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात,विरोधी पक्षनेते विजयराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष दिनकर जाधव,सागर सूर्यवंशी,नगरसेवक सागर सकटे,दादासाहेब माळी,सचिन गायकवाड,हेमंत साळुंखे,सोहोली चे नेते हिंमतराव देशमुख,चिंचणी चे नेते राहुल पाटील,तानाजी करडे,ओमकार अडसुळे,यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top