वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सांगली शहर पदाधिकारी निवड उत्साहात

Admin


सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
                सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सांगली शहर अध्यक्षपदी सागर घोरपडे यांची तर सचिवपदी कृष्णा जामदार तर उपाध्यक्षपदी प्रशांत साळुंखे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये संपन्न झाली. 
            महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य संघटना कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे यांच्यासह संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मारूती नवलाई,जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते व माजी अध्यक्ष नारायण माळी, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल रासनकर, जिल्हा नेते दत्तात्रय सरगर, दरिबा बंडगर, मावळते शहराध्यक्ष अमोल साबळे, मावळते सचिव बाळासाहेब पोरे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रीया झाली.
उपस्थित सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्वानुमते शहराध्यक्षपदी सागर घोरपडे, सचिवपदी कृष्णा जामदार तर उपाध्यक्षपदी प्रशांत साळुंखे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. शहर कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे बाळासाहेब पोरे, श्रीपती रासनकर, बाळासाहेब पाटील, बंडू आष्टेकर, समित मेहता, बंदेनवाज मुल्ला, विनोद पाटील, दिपक सूर्यवंशी, करण वाघमारे, प्रताप दुधारे. या निवडीबद्दल श्री सूर्यवंशी यांच्या हस्ते नवनिर्वाचीत अध्यक्ष सागर घोरपडे व मावळते अध्यक्ष अमोल साबळे यांचा, सचिन चोपडे यांच्या हस्ते प्रशांत साळुंखे यांचा तर मारूती नवलाई यांच्या हस्ते कृष्णा जामदार यांचा सत्कार करण्यात आला. 
            निवडीनंतर वृत्तपत्र विक्रेत्यांनी जल्लोष केला.यावेळी प्रदिप आसगावकर, दिपक वाघमारे,बजरंग यमगर, प्रकाश उन्हाळे, संजय शिंदे, बंडू शिंगारे, अक्षय जाधव, देवानंद वसगडे, प्रकाश भोसले, धनाजी मोरे, मच्छिंद्र रासनकर, अनिल कांबळे, गणेश कटगी, सुनिल कट्याप्पा, सुशिल पवार, जयकुमार संगमे, संजय इंदुलकर, अतुल रूपनर, आनंद मोरे, अंकुल कोलेकर, बी.एच. पाटील, अमोल चव्हाण, विजय कांबळे, अशोक साळुंखे, विशाल पवार, श्री इंगळे, यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top