विठ्ठल भक्तांना दर्शनाच्या बाबतीत शिस्तबद्ध व आपुलकीची सेवा

Admin

 

सुधीर घोडकेंबाबत भाविक भक्तांमध्ये प्रशंसनीय उदगा्र
पिलीव : डिजिटल हॅलो प्रभात 

                महाराष्ट्रामध्ये दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या आणि खंडप्राय देशातून असंख्य भाविक मोठ्या संख्येने आणि भक्ती भावाने येत असलेल्या पंढरपूर नगरीमध्ये श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्तांना विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा अंतकरणापासून ध्यास लागलेला असतो.अशा वेळेला गेल्या अनेक वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे व मंदिरे समितीच्या नियमाच्या चौकटीत राहून शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना दर्शन व्यवस्थित मिळण्याच्या भावनेतून एकाग्रतेने व निष्ठेने काम करीत असलेले सुधीर घोडके हे अनेक भाविक भक्तांचा अपंगांचा व वृद्ध लोकांचा आपल्या सेवेच्या माध्यमातून दुवा घेत असल्याचे बोलले जात आहे.अपंग ,वृद्ध अशा भाविक भक्तांना दर्शन कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता शिस्तबद्ध पद्धतीने सेवा करीत ते आपल्या कर्तव्यावर असतात. असे अनेक भाविक भक्त आमचे प्रतिनिधीशी संवाद करीत असताना सांगितले. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान होणे सुद्धा गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. श्री सुधीर घोडके यांचे कुटुंबीय धार्मिक पद्धतीचे संस्कार घेऊन आल्यामुळे त्यांच्या रक्तातच परमार्थ असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले .अशा या प्रामाणिक व एकनिष्ठतेबद्दल शिस्तप्रिय व सर्वांना दर्शनाच्या सेवेचा लाभ होण्यासाठी कार्यरत असलेल्या सुधीर घोडकेंबाबत असंख्य भाविक भक्त व वृद्ध मंडळी अपंग मंडळी प्रशंसनीय उदगा्र काढत असल्याचे दिसून आले.


To Top