ग्रामीण भागातील तरुण प्रशासकीय सेवेत सहभागी हे कौतुकास्पद : सत्यजित देशमुख

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
                    ग्रामीण भागातील तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत सहभागी होत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर समाजातील गरीब घटकांना मदत करण्याची भूमिका ठेवा असे आवाहन भाजपा नेते, सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले. कोकरूड ता.शिराळा येथील नवनाथ भिमराव माने यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेअंतर्गत मंत्रालय कनिष्ठ सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल कोकरूड ग्रांमस्थाच्या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होता.यावेळी ते बोलत होते. यावेळी पी.एस आय.पदी निवड झाल्याबद्दल अजिक्य कोरे,मुंबई पोलीस रोहित कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. हिंदकेसरी पै. दिनानाथ सिंह प्रमुख अध्यक्षस्थानी होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडीक बाबा, माजी जि.प.सदस्य संपतराव देशमुख भाऊ,युवा सहकारी विकास नांगरे, अनिल पाटील,शँकरराव पुजारी प्रमुख उपस्थित होते.
            यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, एक ध्येय घेऊन आज चे तरुण स्पर्धा परीक्षेला सामोरे जात आहेत. यश अपयश येत असते तरीही या कसोटी मध्ये ठिकून अभ्यास करून आपले ध्येय साध्य करत असतात. ही अभिमानास्पद बाब आहे. कोकरूड गावाला राज्यात वेगळी ओळख आहे. विधान परिषद माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्याचे स्वप्न होते ग्रामीण भागातील तरुण अधिकारी वर्गात जायला पाहिजे. ते स्वप्न आज सत्यात उतरत आहे.विद्यार्थीनी आपले उदिष्ट ठेवून वाटचाल करणे आवश्यक आहे.
सम्राट महाडिक म्हणाले : स्पर्धा परीक्षेतील यशामध्ये विद्यार्थी इतकाच पालकांचा सहभाग महत्वाचा असतो. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उपलब्ध झाल्याने त्यांचा फायदा आपल्याला होत आहे.यावेळी संपतराव देशमुख,दिनानाथ सिंह,अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी आंनदाराव माईंगडे,गजानन पाटील,पोपट पाटील, सुहास पाटील,उपसरपंच अंकुश नांगरे,माजी नगरसेवक केदार नलवडे,मोहन पाटील,आंनंदा धुमाळ,भिमराव माने, शालन माने,जे. डी. खांडेकर सर,अजित पाटील, ए. सी. पाटील, सुनिल पाटील, अभिजित शेणेकर,बी. के. पाटील,माजी सरपंच वृषालीताई पाटील, आदीसह मान्यवर उपस्थित होते.
To Top