लंगरपेठला माती परीक्षण कार्यशाळा संपन्न

Admin
कवठेमहांकाळ : डिजिटल हॅलो प्रभात
                लंगरपेठ (ता.कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात माजी वसुंधरा ४.० अंतर्गत माती परीक्षण व मातीतील कार्बनचे महत्व याबाबत कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सदर कार्यशाळेमध्ये माती परीक्षणाचे महत्त्व व मातीतील कार्बनचे महत्व तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व याबाबत उपस्थितीतांना माहिती सांगण्यात आली.शेतकऱ्यांनी शेतातील पालापाचोळा न जाळता त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करण्याबाबतचे माहिती सदर कार्यशाळेत देण्यात आली.तसेच जैविक खताबाबत उपयुक्त माहिती सांगण्यात आली. पर्यावरण पूरक सेंद्रिय खते असल्याने त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबतची माहितीही यावेळी देण्यात आली.सदर कार्यक्रमाला कृषी अधिकारी श्री आर जी सरक यांनी माती परीक्षण व मातीतील कार्बनचे महत्त्व पटवून दिले.सदर कार्यक्रमाला कवठेमहांकाळ बाजार समितीचे चेअरमन महेश पवार,सरपंच सौ अंजना कांबळे,उपसरपंच दत्तात्रय सूर्यवंशी,ग्रामसेवक विकास माने, हॅण्ड फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानू कांबळे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य,शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार ग्रामसेवक विकास माने यांनी मानले.
To Top