झिलच्या वेदांत व अर्पिताचा स्केटिंग मध्ये तिहेरी धमाका

Admin

कुपवाड : डिजिटल हॅलो प्रभात
        येथील जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे दि. २५ व २६ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये झिल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी वेदांत चंद्रकांत कुंभार याने ५०० मिटर रिंक रेस ,१००० मीटर रिंक रेस व ३ किलो मीटर रोड रेस या तिन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून झिलचे नाव उंचावले आहे. तसेच कु अर्पिता चंद्रकांत कुंभार हिने ५०० मिटर रिंक रेस , १००० मीटर रिंक रेस व ३ किलो मीटर रोड रेस या तिन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून भावापेक्षा मी कमी नाही हे दाखवून दिले आहे. या भावा बहिणीची विभागीय स्पर्धेसाठी निवड करणेत आली आहे. या स्पर्धकांना झिलचे स्केटिंग प्रशिक्षक अभय सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
        झिलचे डायरेक्टर संजय महाडिक यांनी या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रिन्सिपल सौ.मेघाली नरगच्चे , अडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर अभय भिलवडे यांनी यशस्वितांचा सन्मान केला. सायन्स कॉर्डीनेटर अलविन सिंग , कॉमर्स कॉर्डिनेटर सौ.नेहा सारडा , स्कुल कॉर्डिनेटर जावेद नदाफ व श्रीमती अंजली जोशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या गुणवंत खेळाडूंचे कौतुक केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
To Top