इचलकरंजी : डिजिटल हॅलो प्रभात
माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्ज प्राप्त झालेनंतर सदर अर्जातील माहिती देण्याच्या प्रक्रियेसाठी चेक लिस्ट तयार केलेस अर्जदारास माहिती उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. त्याचबरोबर सर्व जन माहिती अधिकार्यांनी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागणी केलेली माहिती पारदर्शकपणे देण्याचे धोरण ठेवणेच्या सुचना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केल्या. माहिती अधिकार दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देवून आणि विविध उपक्रम राबवून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार इचलकरंजी महापालिका स्तरावर माहिती अधिकार दिन साजरा करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
महापालिकेच्या सभागृहात माहितीचा या विषयावर विशेष कार्यशाळाही झाली. यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी स्लाईडशोद्वारे माहिती अधिकार अधिनियमातील कायदेशीर बाबींची माहिती दिली. मुख्य लेखा, वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी सर्व विभाग प्रमुख, जन माहिती अधिकारी यांनी आपल्याकडे आलेल्या माहिती अधिकार अधिनियमातील अर्जदाराचे स्वागत करावे. जेणेकरून कार्यालयाच्या कामकाजाबाबत सकारात्मकता निर्माण होईल, असे सांगितले. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी माहिती अधिकार कामकाजाबाबत आपले अनुभव कथन करून कामकाजात पारदर्शकपणा ठेवण्याच्या सुचना केल्या. कार्यक्रमास कामगार अधिकारी विजय राजापुरे यांच्यासह महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत काम पाहणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.