टीम इंडियाचा माजी कर्णधार अफगाणिस्तान सोबत..?

Admin
मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात
        भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला लवकरच सुरुवात होत आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होतेय. त्यासाठी सर्व संघ जय्यत तयारी करत आहेत. ह्यातच आता अफगाणिस्तान संघाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळपट्टींवर अफगाणिस्ताचा संघ दबदबा गाजवेल असे अनेकांचे मत आहेत. मोहम्मद नबी, राशीद खान आणि मुजीब-उर-रहमान अशी जबरदस्त फिरकीपटूंचे त्रिकुट अफगाणिस्तान संघाकडे आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघमजबूत दिसत आहे, त्यात त्यांना आणखी बळ मिळाले आहे. क्रिकेट बोर्डाने अजय जडेजा याची वन-डे वर्ल्ड कप 2023 साठी मेन्टॉर (मार्गदर्शक) म्हणून नियुक्ती केली आहे..भारताच माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज अशी अजय जडेजा याची ओळख आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याची माहिती दिली... 
        
        अफगाणिस्तान ७ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्धच्या लढतीने वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला यजमान भारताविरुद्ध ते दिल्लीत खेळतील. अजय जडेजाची मेंटॉर म्हणून नियुक्ती अफगाणिस्ताच्या फायद्याची ठरू शकते. अजयकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहेच, शिवाय त्याला भारतीय खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे.
        अजयने १९९२ ते २००० या कालावधीत १५ कसोटी सामन्यांत ५७६ धावा केल्या आहेत आणि ९६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. शिवाय त्याने १९६ वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यात ३७.४७च्या सरासरीने ५३५९ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व ३० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्याकडे १११ प्रथम श्रेणी आणि २९१ लिस्ट ए क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याच्या नावावर एकूण ८०००+ धावा, ३१ शतकं व ८८ अर्धशतकं आहेत.
To Top