सव्वा नऊ लाखाच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

Admin

  सव्वा नऊ लाखाच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद  

कोपरगाव : डिजिटल हॅलो प्रभात
१९ जानेवारी २०२४ चे रात्री १२ ते २० जानेवारी २०२४ रोजीचे पहाटे ५ वा. चे सुमारास फिर्यादी संतोष भास्कर भदे रा. सावळीविहीर खु॥ ता. राहाता यांची त्यांच्या घरासमोरून एक लाख नऊ हजार रू. किमतीची २४ क्विंटल ३५ किलो वजनाच्या सोयाबीनच्या गोण्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत शिर्डी पोस्टे गु.र.नं. ४१/२०२४ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोहेकॉ विजय पवार, पोहेकों अण्णासाहेब दातीर, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोकों सोमेश गरदास अशांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असता, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा अमोल वाल्मिक दंडवते, अमोल रामदास आहेर दोन्ही रा. तीनचारी कोकमठाण ता. कोपरगाव व शुभम रमेश भालेराव रा. कोपरगाव यांनी केलेला असुन सदरचा चोरीस गेलेला माल श्रीकांत विलास चौरे, रा. खडकी ता. कोपरगाव याच्या टाटा आईस टेम्पो मध्ये भरून कोपरगाव कडुन येवल्याकडे घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पोलीस स्टाफसह कोपरगाव ते येवला जाणारे रोड वर श्रीदत्त मंदिरासमोर सापळा रचुन थांबलेले असताना कोपरगाव कडुन एक क्रिम कलरचा टाटा आईस टेम्पो येताना दिसला त्यास थांबवुन त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव श्रीकांत विलास चौरे, रा. खडकी ता. कोपरगाव असे असल्याचे सांगितले. 

बातमीप्रमाणे खात्री झाल्याने सदर चालकास टेम्पो मध्ये काय आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, अमोल वाल्मिक दंडवते, अमोल रामदास आहेर दोन्ही रा. तीनचारी कोकमठाण व शुभम रमेश भालेराव रा. कोपरगाव यांची सोयाबीन विक्रीसाठी घेऊन चाललो आहे. ते कोठे आहे याबाबत विचारले असता तेही पाठीमागुन इर्टीगा कार मधुन येत आहेत असे सांगितल्याने पाठीमागुन येणारी इर्टिका कार पोलिसांनी थांबवुन त्यामधील इसमास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अमोल वाल्मिक दंडवते अमोल रामदास आहेर असे असल्याचे सांगितले त्यावेळी शुभम रमेश भालेराव हा तेथुन पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही सदरची सोयाबीन ही सावळीविहीर खु॥ ता. राहाता येथुन २० जानेवारी रोजी रात्री २ वाजता इर्टिका कारमध्ये गोण्या भरून चोरून आणली असुन ती विक्री करण्यासाठी टाटा आईस टेम्पो मध्ये भरून घेऊन चाललो होतो असे सांगताच पोलिसांनी आरोपीकडून १४ क्विंटल ३५ किलो वजनाच्या सोयाबीनच्या १ लाख ९ हजार रुपये किमतीच्या विविध गोण्या, २ लाख ५० हजार रुपये किमतीचा टाटा आईस टेम्पो, इर्टीका कार ५ लाख ७० हजार रुपये असा एकूण ९ लाख २९ हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करत अमोल वाल्मिक दंडवते, अमोल रामदास आहेर, श्रीकांत विलास चौरे याना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने २३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोहेकॉ विजय पवार, पोहेकों आण्णासाहेब दातीर, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोकों सोमेश गरदास यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालु असुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

To Top