विद्यार्थीनीच्या घरात घुसून शिक्षकाचे घाणेरडे कृत्य ; आधी अत्याचार आणि नंतर हत्या करून मृतदेह लपवला पाणीच्या टाकीत

Admin
विद्यार्थीनीच्या घरात घुसून शिक्षकाचे घाणेरडे कृत्य 
आधी अत्याचार आणि नंतर हत्या करून, मृतदेह लपवला पाणीच्या टाकीत


राजस्थान : डिजिटल हॅलो प्रभात
17 वर्षीय विद्यार्थीनीच्या मध्यरात्री घरात घुसून शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम शिक्षकाने मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवला. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

अधिक माहिती अशी की, आरोपीचं नाव प्रल्हादराम असून मुलीच्या घरचे लग्नासाठी बाहेरगावी गेले असल्याचे लक्षात घेऊन, नराधम शिक्षकाने शनिवारी मध्यरात्री 12 वाजता घरात घुसून मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर कुणाला सांगितलं तर जिवे मारेन अशी धमकी दिली. मुलीकडून त्याला विरोध करण्यात आला. त्यानंतर त्याने मुलीला संपवून मृतदेह पाण्यचा टाकीत फेकला आणि तेथून पसार झाला.


सापळा रचून आरोपीला ठोकल्या बेड्या
पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रल्हाद गावातील सरकारी शाळेत कार्यकरत होता. त्याचं वर्तन चांगले नसून तो मुलींसोबत वारंवार छेडछाड करायचा. त्याशिवाय शारीरिक संबंध करण्यासाठी मुलींवर दबाव टाकत होता. हत्या झालेल्या मुलीसोबतही त्याने छेडछाड केली होती. मुलीने शिक्षकाबद्दल कुटुंबियांना सांगितल्यानंतर पंचायत बोलवून आरोपीला समजावून सोडण्यात आले होते. त्यानंतर मनात राग वाढल्यानंतर त्याने हे कृत्य केळ्याचे निष्पन्न झाले. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रल्हादवर 376, 302, 326, 450 कलमांअतर्गत गुन्हा दाखल करून, फरार आरोपीला सापळा रचून बेड्या ठोकल्या.
Tags
To Top