उद्धव ठाकरेनी घेतले वसंतदादांच्या समाधी स्थळाचे दर्शन ; विशाल पाटील यांच्या मातोश्रीना काय म्हणाले उद्धव ठाकरे ....

Admin
उद्धव ठाकरेनी घेतले वसंतदादांच्या समाधी स्थळाचे दर्शन

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 
सांगली होत असलेल्या शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सांगलीत पोहोचले. मिरजेत उध्दव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये पोहोचताच उद्धव ठाकरेनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळी जाऊन समाधीचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांच्या समावेत खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील यांची ही भेट घेतली. आम्ही सर्वजण सोबत, चांगल्या पद्धतीने जाऊ, काही काळजी करू नका, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजाभाभी पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केला.

Tags
To Top