ब्रेकिंग न्यूज : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Admin
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली: डिजिटल हॅलो प्रभात 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला.


 त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

To Top