रात्र महाविद्यालयात दंत तपासणी व सल्ला शिबीर संपन्न

Admin
रात्र महाविद्यालयात दंत तपासणी व सल्ला शिबीर संपन्न 

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

येथील लट्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजमध्ये मोफत दंत तपासणी व सल्ला शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने व कवलापूरच्या वसंतरावदादा पाटील कॉलेज व रूग्णालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या कॉलेजने शिबीरासाठी आवश्यक साधने, तांत्रिक कर्मचारी वर्ग आणि दंतवैद्यांची सेवा पुरविली होती. या शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.व्ही. पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी  त्यांनी दंत आरोग्याचे महत्व व दातांची घ्यावयाची काळजी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        सुरवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकम अधिकारी डॉ.बी.ए.कोटलगी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर शिबीरातील दंतवैद्य व तांत्रिक कर्मचा-यांचा पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ.बी.व्ही.पाटील व उपप्राचार्य डॉ.एस.डी.पाटील यांनी सत्कार केला. या शिबीरात विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी दंत तपासणी करून घेऊन योग्य उपचारासाठी तज्ञाचा सल्ला घेतला.

        या शिबीराच्या यशासाठी प्रा.एन.डी.बनसोडे, डॉ.राजू सांवत, प्रा.पी.डी. पाटील, डॉ.सुवर्णा सुर्यवंशी, डॉ.शिवप्रसाद शेटे, यांचे सहकार्य लाभले. कार्यालय अधीक्षक श्री.धम्मकिर्ती, सौ श्रृतिका हेरवाडे, श्री.प्रदीप पाटील, श्री.दिपक चौगुले, श्री.अमोल पाटील, श्री.आशिष मगदूम, श्री.कमलाकर बंगाल, श्री.धीरज पाटील यांनी शिबीराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी डॉ. प्रिया टेळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Tags
To Top