वल्लभी शेंडगे हिने मिळवले भारत सरकारचे पेटंट

Admin
वल्लभी शेंडगे हिने मिळवले भारत सरकारचे पेटंट
भारतातील पाचवी तर मुलींमध्ये दुसरी यंग इनोव्हेटर

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

माधवनगर येथील वल्लभी किशोर शेंडगे या नऊ वर्षाच्या मुलीने गार्डनमधील अनोख्या झोपाळ्याच्या केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले. सर्वात लहान वयात अश्या पद्‌धतीचे संशोधन करून वल्लभीने देश पातळीवर पाचवे व मुलींमध्ये दूसरी यंग पेटंट धारक होण्याचा मान मिळवला. तसेच महाराष्ट्रात प्रथम 'यंग इनोव्हेटर' बनून माधवनगर व सांगली जिल्ह्याचे नाव लौकीक केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे समाजातील सर्व स्तरांकडून अभिनंदन होत आहे.

गार्डनमधील अनोख्या खेळ प्रकाराचे केलेलं नाविन्यपूर्ण संशोधन
या संशोधनाने गार्डनमधील खेळ प्रकारात अनोखा अविष्कार तयार झाला आहे. तिने संशोधित केलेल्या झोपाळ्यामुळे एकापेक्षा जास्त मुलांना आनंद घेता येईल असा झोपाळा बनवला आहे.
तिच्या या अनोख्या वैशिष्ठपूर्ण संशोध‌नाचे भारत सरकारच्या पेटंट विभागाकडे ॲप्लिकेशन केले होते. या संशोधनाचे पेटंट विभागाने मूल्यमापन करुन त्याच्या नाविन्याला मान्यता देऊन प्रमाणित केले आणि ग्रँट सर्टिफिकेट दिले.

वल्लभीने केलेल्या या संशोधनात रिसर्च ट्रेनिंग क्षेत्रात काम करणारे तिचे वडील उद्योजक किशोर शेंडगे यांचे आणि पेटेंट क्षेत्रात काम करणाऱ्या मायक्रेव्ह कन्सल्टन्सी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ध्रुव ब्रम्हभट्ट, तसेच भारत सरकारच्या मान्यता-प्राप्त पेटंट एजेंट पूजा मेनन व टीम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तिच्या या यशाबद्दल सांगली येथील उद्योजकांच्या टिचिंग लर्निंग कम्युनिटी (TLC) या संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी मिरज येथील उद्योजक किशोर मिराशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी संजीव कुलकर्णी, उज्वल साठे, संताजी कदम व महेश पाटील, विजय भगत, विजय सवदी, रविंद्र अथणे,अस्मिता कुलकर्णी, देवदत्त फडके, डी.एन. देशपांडे, विद्‌याधर शेंडगे आदी उद्योजक मान्य- वरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेचअशोकजी दुगाडे यांनी व विशाल मंडलिक यांनी तिच्या यशाबद्दल कौतुक करून दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.

To Top