नदी पात्रात आढळले अनोळखी इसमाचे प्रेत...

Admin
नदी पात्रात आढळले अनोळखी इसमाचे प्रेत

लोहा : डिजिटल हॅलो प्रभात
लोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमी पुलाखाली एका पंचेचाळीस वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सदरील घटनेप्रकरणी प्रारंभी लोहा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लोहा बस्थानकापासून शहर अवघ्या दीडशे मिटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमी पूला खालील पाण्यात दि.२१ रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे कचरा वेचणाऱ्याच्या निदर्शनास येताच त्याने इतर नागरिकांना घटनेची माहिती कळवली. सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. प्रेत सडलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शव विच्छेदन करण्यात येवून बाजूलाच असलेल्या स्मशानभूमीत सदरील प्रेतास दफन करण्यात आले.

ओळख पटविण्यासाठी लोहा पोलिसांनी पथक नियुक्त केले असून सदरील प्रेताची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील प्रेत हे चार ते पाच दिवसांपूर्वी पाण्यात पडले असावे. कदाचित तो मच्छिमार असेल यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. खून की आत्महत्या अथवा अपघात याबद्दल लोहा शहरातील नागरिकांतून चर्चा केली जात आहे.

Tags
To Top