विमानतळ समितीच्या सल्लागारपदी टिंगरेंची निवड |
पुणे : हॅलो प्रभात
धानोरी प्रभाग क्रमांक एकचे कार्यक्षम नगरसेवक अनिल उर्फ बॉबी यांची पुणे विमानतळ समितीच्या सल्लागारपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण समितीकडे केंद्रीय नागरी हवाई आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने अनिल टिंगरे यांच्यासह अभिजित पवार,सुधीर मेहता,अमित परांजपे व अखिलेश जोशी या पाच जणांची नावे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण विभागाकडे नावे देण्यात आली होती.त्यानुसार अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांना नियुक्तीचे पत्र प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आले असून अनिल टिंगरे हे धानोरी प्रभाग क्रमांक एक मधून दोन वेळेस महापालिकेवर निवडून गेले असून येरवडा,धानोरी,कळस क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी प्रभाग अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून याबरोबरच नाव समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे.स्थायी समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले असल्यामुळे त्यांचे हे कार्य पाहून टिंगरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष जगदिश मुळीक, मा.नगरसेवक योगेश मुळीक,सहकार भारतीचे वडगाव शेरी विभाग अध्यक्ष जितेंद्र जगताप,वडगाव शेरी भाजपचे विभाग अध्यक्ष अर्जुन जगताप आदींनी टिंगरे यांच्या निवडीने अभिनंदन केले.