रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी पुणे महानगर प्रमुख पदी नियुक्ती |
पुणे : हॅलो प्रभात
पुण्यातील कसबा मतदार संघाचे माजी आ. रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसला बाय बाय करत शिवधनुष्य हाती घेतलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रवींद्र धंगेकरांना पुणे शहरात पक्षवाढीसाठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ही निवड करण्यात आल्याचं पञात म्हटलं आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने हे पञ देण्यात आलं आहे. मात्र, पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यांना शिवसेनेकडून कोणतं पद दिले जाणार याची चर्चा सुरू होती. शिवसेनेनं धंगेकर यांच्यासाठी चक्क नव पद निर्माण केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांची निवड केल्यामुळे पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार का हे काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र या निवडीने शिंदे गटाला बळ मिळालं आहे.
काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी धंगेकर यांनी मी कुठल्याही पदासाठी नव्हे तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. असं विधान केलं होतं. मात्र त्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना साजेसं कोणतं पद धंगेकरांना दिल जाणार याची चर्चा सुरू होती. अखेर धंगेकरांसाठी नवं पद निर्माण केलं. हे पद आहे महानगर प्रमुख पद.
आगामी स्थानिकच्या तोंडावर शिंदे सेनेच्या शिवसेनेला पुणे महानगरात सगळीकडे दारं उघडताना दिसत आहे. यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांची वाणवा असणाऱ्या शिवसेनेला चांगलेच दिवस येताना दिसत आहेत.

दरम्यान धंगेकर यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याने ते राज्यभर चर्चेत आले. काॅग्रेसच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार बनून विधानसभेत गेले. त्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सातत्याने आक्रमक पवित्रा घेत चर्चेत आले. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण असो किंवा गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन त्यांनी महायुती सरकारला सातत्याने लक्ष केलं होतं. मात्र, नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढील राजकीय मार्गावर वळण घेत धंगेकर यांनी काॅंग्रेसला बाय बाय करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांचा प्रवेश घडवून आणत एका दगडात दोन पक्षांची शिकार करण्याचा राजकीय डाव एकनाथ शिंदे यांनी टाकला होता. त्यात ते यशस्वी झाले. धंगेकर यांनी धनुष्यबाण हाती घेत पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी आता माजी आ. रवींद्र धंगेकर यांच्यावर असणार आहे.