भीषण अपघातात माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन

Admin
भीषण अपघातात माजी आमदार
आर.टी. देशमुख यांचे निधन

लातूर : हॅलो प्रभात
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन झाले आहे, अपघातानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


लातूर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आर. टी. देशमुख (जीजा) यांचे दु:खद निधन झाले. जीजांच्या जाण्याने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली -  बजरंग सोनवणे (खासदार बीड लोकसभा) 

दरम्यान आर टी देशमुख यांच्या गाडीचा  लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला होता. या अपघातात देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
To Top