गॅसच्या स्पोटात महिलेचा भाजून जागीच मृत्यू

Admin
गॅसच्या स्पोटात महिलेचा भाजून जागीच मृत्यू 

रुकडी : हॅलो प्रभात
रुकडी ता. हातकणंगले येथील पार्वती आंबोळे वय ७८ या मराठी शाळेजवळील आपल्या छोट्याशा खोलीत एकट्याच राहात होत्या. त्या गोळ्या बिस्किट विकत आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान मध्य रात्री १२ च्या दरम्यान स्फोटाचा मोठा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी  यांनी तात्काळ ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी आगीचा उडालेला भडका इतका मोठा होता की, घराच्या भिंतींची पडझड होऊन पत्रे जळून खाक झाले होते. हे पाहून पदाधीकाऱ्यां सह ग्रामस्थांनी आग विझवून आंबोळे यांना वाचवता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना अपयश आले. 
.

या स्फोटात आंबोळे यांचा झोपल्या ठिकाणीच मृत्यू झाला होता. दरम्यान यावेळी हातकणंगले पोलिसांनी ही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास ए.पी.आय यादव करत आहेत. घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की, मयत आंबोळे या जिवंत आहेत की मयत झाले आहेत हे बघण्याचे धाडस कोणीही करत नव्हते. मात्र संतोष रुकडीकर, शितल खोत, सचिन इंगळे यांनी याची गंभीर दखल घेत स्वतः पाण्याचा टँकर भरून घेऊन येत आग आटोक्यात आल्यानंतर तात्काळ स्वतःच्या हाताने पडझड झालेले भिंतींचे ढीग बाजूला सारत तात्काळ शव बाहेर काढत शवाविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पुढे पाठवले.
To Top