![]() |
कुपवाड बस स्टँड लगतच्या सार्वजनिक मुतारीची दुरावस्था महानगरपालिका प्रशासनाचा निषेध |
कुपवाड : हॅलो प्रभात
कुपवाड गावठाणमधील बस स्टँड लगत असलेल्या मोडकळीस आलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था व अस्वच्छता व दुर्गंधी यासाठी त्या मुतारीचे जागतिक दर्जाची मुतारी. सौजन्य-सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण करून हार घालून करण्यात आले. तसेच महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.मुख्य गावठाण परिसरात एकमेव पुरुषांच्यासाठी सार्वजनिक मुतारी आहे.येणाऱ्या महिलांच्या साठी तर सोयच नाही.भाजीविक्रेते, दुकानदार,नागरिक,जेष्ठ नागरिकांच्या साठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मुतारीची अवस्था खूप बिकट आहे.दरवाजेच नाहीत.त्याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहे.सदर दुर्गंधी असलेल्या मुतारीमध्ये नीट उभारताही येत नाही. याबद्दल महानगरपालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे.तरी यांना जाग येत नाही,जाणीव होत नाही,पावडर मारण्यापलीकडे यांचे काहीच काम नाही.तरी महानगरपालिका प्रशासनास जाग यावी,यासाठी निषेध म्हणून आज सदर मुतारीस कुपवाड मधील जागतिक दर्जाची मुतारी.सौजन्य-सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे हार घालून नामकरण करण्यात आले
हे आंदोलन कुपवाड येथील सनी धोतरे, राजू पवार, समीर मुजावर, अमोल कदम, अख्तर मुजावर, सिकंदर मुल्ला, संजय सर्वोदे, नूरमहमद ढालाईत, गवळी, टिपू मुजावर, गोपाल पोळ, संदेश माने, यांनी केले
हे आंदोलन कुपवाड येथील सनी धोतरे, राजू पवार, समीर मुजावर, अमोल कदम, अख्तर मुजावर, सिकंदर मुल्ला, संजय सर्वोदे, नूरमहमद ढालाईत, गवळी, टिपू मुजावर, गोपाल पोळ, संदेश माने, यांनी केले