मद्यधुंद कार चालकाने MPSC च्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं ; काही विद्यार्थी रविवारी जाणार होते परीक्षेला सामोरे...

Admin
मद्यधुंद कार चालकाने MPSC च्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं 
काही विद्यार्थी रविवारी जाणार होते परीक्षेला सामोरे... 

पुणे : हॅलो प्रभात
येथील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद कार चालकाने उडवल्याची घटना घडली. दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.पुण्यातील भावे हायस्कूलजवळ शनिवारी संध्याकाळी  ही घटना घडली.  या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. 


सर्व जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान जखमींमध्ये काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार होते. भावे हायस्कूलचा परिसर अरुंद रस्ते आणि छोटी गल्ली असलेला परिसर. असं असतानाही कार चालक भरधाव वेगाने आला. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोर चहा पित असलेल्या विद्यार्थ्यांना त्याने उडवलं. जखमींमध्ये तीन मुलीही असल्याची माहिती आहे. 
Join Our WhatsApp Group 
Tags
To Top