![]() |
बस विहिरीत जाता जाता थोडक्यात बचावली ; 17 प्रवासी जखमी |
येळावी : हॅलो प्रभात
तासगाव तालुक्यातील येळावी गावाजवळ मंगळवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. तासगाव आगाराची तासगाव-चिंचवड बस रस्त्याशेजारील नाल्यात अडकून थेट विहिरीत कोसळण्याच्या काही सेकंद आधीच थांबली. या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.ही घटना दुपारी अंदाजे 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान, कराड-तासगाव रस्त्यावर येळावी गावाजवळ घडली.

बस पुण्याहून तासगावकडे परत येत असताना, निळकंठ बंगला परिसरात चालकाचे नियंत्रण सुटले. बस नाल्यातून घसरत थेट विहिरीच्या कडेपर्यंत गेली, मात्र नाल्यात चाके अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.अपघातात जखमी झालेल्या 17 प्रवाशांपैकी 14 जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, तर उर्वरित 3 गंभीर जखमींवर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातानंतर बसमधील संतप्त प्रवाशांनी चालकाला धारेवर धरत मारहाण केली. प्रवाशांना तासगाव आगाराच्या आपत्तीकालीन बसने तासगावमध्ये पोहोचवण्यात आले.या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. तासगाव आगाराने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
![]() |
Join Our WhatsApp Group |