![]() |
डंपरच्या धडकेत पतीच्या समोरच पत्नीचा मृत्यू |
सांगली : हॅलो प्रभात
दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला. भरधाव येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या समोरच पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी विश्रामबाग उड्डाणपुलावर घडली. अधिक माहिती अशी, पूनम सुशांत जाधव (वय २५, रा.कवलापूर) असे मृत महिलेचे नाव असून, या अपघातात त्यांचे पती सुशांत किरकोळ जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरचालकाला पकडून चांगलाच चोप दिला.
कवलापूर (ता.मिरज) येथील नलवडे दाम्पत्य दररोज एकत्रच कामासाठी सांगलीत येत तसा हा त्यांचा रोजचाच प्रवास असायचा. दीड वर्षापूर्वीच विवाह झालेले सुशांत आणि पूनम हे कामासाठी सांगलीत येत होते. सुशांत हे पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कामावर जाणार होते. दररोजच्या प्रमाणे मंगळवारी (दि.२४) सकाळी साडेदहाच्या सुमारास उड्डाणपुलावरून जात असताना, पाठीमागून वेगाने आलेल्या काँक्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
![]() |
Join Our WhatsApp Group या धडकेत पूनम या डंपरखाली सापडल्या आणि सुमारे ५० फूट फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती सुशांत रस्त्याच्या कडेला फेकले गेले. हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि काही अंतरावर डंपरचालकाला अडवून त्याला चोप दिला. पूनम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून डंपरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. |