![]() |
आगळगावच्या पाटील कुटुंबाची सलग तिसरी पिढी सैन्यात ; सौरभ याची पासिंग आऊट परेड पुर्ण |
कवठेमहांकाळ : हॅलो प्रभात
आगळगाव (ता.कवठेमहांकाळ) येथील पाटील कुटुंबातील सलग तिसरी पिढीही आज सैन्यात दाखल झाल्याने परिसरातून चांगलेच कौतुक केले जात आहे. आगळगाव येथील पाटील कुटुंबातील प्रथम आजोबा स्व.दादासाहेब पाटील यांनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवा केली.त्यानंतर त्यांचे सुपुत्र स्व.संजय पाटील हेही सैन्य दलात भरती झाले होते व त्यांनीही आपली सेवा उत्कृष्टरित्या पूर्ण केली होती.
आता त्यांच्या पश्चात आता त्यांचा मुलगा सौरभ हाही आज सैन्य दलात दाखल होत आहे.ही खरंच अभिमानाची गोष्ट असुन,त्यामुळे या पाटील कुटुंबातील सलग तिसरी पिढी सैन्यदलातुन देश सेवा करत आहेत.ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
त्याचबरोबर या घराण्यातीलच सौरभचे चुलते विजय दादासाहेब पाटील, राजाराम दादासाहेब पाटील व अजित दादासाहेब पाटील या तीघानीही सैन्य दलाद्वारे देशसेवा घडवली आहे.आता तर सौरभ पाटील याच्या माध्यमातून पाटील कुटुंबातील सलग तिसरी पिढीच देशसेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे.ही अभिमानाची गोष्ट असुन,त्यामुळे याचे परिसरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.

Join Our WhatsApp Group |