वेडेपणाची हद्द पार ; चक्क मनगट कापून रक्ताने लावला विराटच्या पोस्टरला टिळा

Admin
वेडेपणाची हद्द पार ; चक्क मनगट कापून रक्ताने
लावला विराटच्या पोस्टरला टिळा

मुंबई : हॅलो प्रभात 
आयपीएलमध्ये  17 वर्षानंतर  झालेल्या आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या उत्साहाने भरलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. कोणी भावुक होऊन आनंद व्यक्त करत आहे. आरसीबीच्या विक्ट्री परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


या व्हिडिओमध्ये  विराट कोहलीचा आणि आरसीबी एक चाहत्याने केलेली गोष्टत  त्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक फॅन स्वतःचे मनगट कापून त्याच्या रक्ताने विराट कोहलीच्या पोस्टरवर टिळा लावत आहे. ज्यामध्ये त्याने पुन्हा- पुन्हा  त्या ब्लेडने तो आपलं मनगट कापतो. त्यामुळे रक्ताची धार वाहू लागते.  तरुणाने तीन वेळा आपले मनगट कापतो आणि कोहलीच्या पोस्टरवर रक्ताने टिळा लावतो. दरम्यान घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Join Our WhatsApp Group 
To Top